
स्थैर्य, 14 मार्च, सातारा : वाई पोलीस ठाण्याच्या अनागोंदी कारभाराची नुकतीच बेधडक पोलखोल केली होती. वाई पोलीस ठाण्यात खर्याच खोटं व खोट्याच खरं तडजोडीच राजकारण अशा अनेक भानगडीच्या मुद्द्यावर जनहितासाठी पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु वाई पोलिसांवर याचा परिणाम शून्य झाला असून वाई पोलिसांच्या कारभाराची वार्यावर वरात अन युवकांचा जीव धोक्यात असं म्हणण्याची वेळ वाईच्या जनतेवर ओढवली आहे.
वाईच्या डिबी पथकाच्या अर्थकारणाच्या जोरावर बर्याच अवैध धंद्याना वाई शहर व परिसरात रटरटीत ऊत आला आहे. किरकोळ गुन्ह्यातील आरोपी पकडून वाईच्या पोलिसांनी कितीही प्रसिद्धीचा आव आणला तरी सराफ दरोडे, जबरी चोर्या, गुटखा व ड्रग्ज इंजेक्शन विक्री, गावठी कट्टे पोक्सो व अपहरण घटनाव इतर गंभीर खर्या गुन्ह्यात वाई शहरात मोठे तडजोडीचे अर्थकारण व राजकारण वाई पोलीस ठाण्यात रोजचं शिजतंय व ते चारचौघात बिनबोभाट भाजून खाल्लं जातंय. वाई डिबी पोलिसांनी कितीही लपवण्याचा व दाबण्याचा प्रयत्न केला तरी ये पब्लिक है सब जानती है बाबू.
वाई शहरात ड्रग्ज इंजेक्शनची विक्री जोरात सुरुआहे. तीही अगदी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर वाईमधील पालक युवकांच्या काळजीपोटी सामाजिक संघटना पोलखोल करणार याबाबत काय द्यायचं बोला या वृत्तांता द्वारे दैनिक सत्य सह्याद्रीने दबंग वाई पोलिसांना सावधान केले होते. परंतु वाटाघाटी तडजोडीच्या अर्थकारणा पायी परिणाम शून्य जागा ठिकाण सर्वकाही माहिती खबर्याद्वारे पुरवूनही कारवाई करण्याअगोदरचं बेसावध आरोपी पसार कसा काय झाला? या तडजोडीचे समीकरण वरिष्ठ पोलीस सोडवणार का? हा खरा कळीचा मुद्दा आहे.

