
स्थैर्य, सातारा, दि. 18 : यंदाच्या लॉकडाउनमुळे उन्हाळ्यातील फळांचा म्हणावा तितका आस्वाद घेता आला नाही. मात्र लॉकडाउन उलटल्यानंतर फळांच्या विक्रीस जोर दिसत आहे. त्यामध्ये जांभळे, करवंदासह बामणोलीसह परिसरातील फणस विक्रीसाठी आल्याने खरेदीसाठी ग्राहकांचा कल वाढला आहे.
कोरोनामुळे यंदा ऐन उन्हाळ्यात लागू झालेल्या लॉकडाउनचा फटका फळविक्रेत्यांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. जिल्ह्यांतर्गत वाहतूक बंद असल्याने फळांची आवक जास्त प्रमाणात झाली नाही. सातारा शहराच्या पश्चिम भागातील डोंगराळ भागातून फणसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
राजवाडा परिसर, भाजी मंडई तसेच राजपथावर फणस व गर्यांची विक्री करताना विक्रेते दिसत आहे. कापा आणि गरवा फणसाची विक्री सुरू आहे.100 ते 150 रुपयांना फणस किंवा 30 रुपये पावशेर दराने गर्यांची विक्री सुरू आहे.