
दैनिक स्थैर्य | दि. 03 एप्रिल 2025 | साखरवाडी | सातारा येथील धर्मादाय आयुक्तांनी साखरवाडी येथील साखरवाडी विद्यालयावर प्रशासकाची नियुक्ती करण्याचा आदेश केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या माहितीस अद्याप अधिकृतपणे पुष्टी न झाली असली तरी, खात्रीशीर सूत्रांच्या माहितीनुसार साखरवाडी विद्यालय या शैक्षणिक संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्याचे समोर येत आहे.
या नियुक्तीमुळे साखरवाडी विद्यालयाच्या कारभारात महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. सदरील संस्थेचे अध्यक्ष म्हणून युवा नेते धनंजय साळुंखे – पाटील हे कामकाज बघत आहेत.
साखरवाडी विद्यालय हे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारी संस्था आहे. दुर्गम भागात शिक्षणाच्या सुविधा पुरवण्यात ही संस्था यशस्वी ठरली आहे. अशा शैक्षणिक संस्थांवर प्रशासकाची नियुक्ती होणे म्हणजे त्या संस्थेच्या कार्य पध्दती आणि व्यवस्थापनात बदल होण्याची शक्यता अधिक आहे.
साखरवाडी विद्यालयावर प्रशासकाची नियुक्ती झाल्याच्या बातमीची अद्याप अधिकृत पुष्टी नाही असली तरी, ही बातमी समाजात चर्चेचा विषय बनली आहे. यामुळे साखरवाडी विद्यालयात प्राधान्य दिलेल्या शैक्षणिक धोरणांवर आणि भविष्यातील निर्णय प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
– ज्याच्याकडे कारखाना, त्याच्याकडे शिक्षण संस्था; हा इतिहास –
साखरवाडी येथील साखरवाडी विद्यालय हे ज्याच्याकडे कारखाना असतो त्याच्याकडे शिक्षण संस्था असते; असा पायंडा आहे. संस्थेची सुरवात हि दि फलटण शुगर वर्क्सचे संस्थापक तात्यासाहेब आपटे यांनी कारखाना सुरु केल्यानंतर कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या पाल्यांसाठी तात्यासाहेब आपटे यांनी शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली होती.
त्यानंतर शिक्षण संस्था हि शामराव भोसले हे अध्यक्ष झाले, त्यानंतर शामराव भोसले हे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. प्रल्हाद साळुंखे – पाटील यांच्याकडे कारखाना होता तरी सुद्धा शामराव भोसले हेच शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. व शामराव भोसले यांच्या निधनाच्या नंतर धनंजय साळुंखे – पाटील हे अध्यक्ष झाले आहेत.