साखरवाडी ग्रामपंचायत पोट निवडणूक सौ. हेमा भोसले विजयी


दैनिक स्थैर्य । दि. २३ डिसेंबर २०२१ । फलटण । अत्यंत अटीतटीने व चुरशीने झालेल्या साखरवाडी ग्रामपंचायत वॉर्ड क्रमांक २ च्या पोटनिवडणूकीत सौ. हेमा विक्रमसिंह भोसले मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या असून निकालानंतर फटाके व गुलालाच्या उधळणीत विजयोत्सव साजरा करण्यात आला.

संपूर्ण फलटण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या साखरवाडी ग्रामपंचायत श्रीराम वॉर्ड क्रमांक २ च्या पोटनिवडणूकीसाठी एकूण १५६१ मतदानापैकी ११२५ मतदान मंगळवार दि. २१ रोजी झाले, आज दि. २२ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. सौ. हेमा विक्रमसिंह भोसले यांना ७०० आणि राजेंद्र काशीनाथ भोसले यांना ४१६ मते मिळाली, ९ मतदारांनी नोटाला मतदान करुन तटस्थ राहणे पसंत केले.

महसूल मंडलाधिकारी व्ही. व्ही. गाडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले, त्यांना तलाठी काळे यांनी मदत केली.


Back to top button
Don`t copy text!