फलटण येथील नाना पाटील चौकातून आळंदी कडे रवाना होत असलेली माऊलींच्या पादुका घेऊन जाणारी एस. टी. बस. |
स्थैर्य, फलटण : आषाढी वारीसाठी दि. ३० जून रोजी पंढरपूर येथे दाखल झालेली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी/पादुका आज आळंदीकडे मार्गस्थ झाल्या, सायंकाळी ५ वाजता एस. टी. बस अर्थात यावर्षीचा पालखी रथ फलटण येथून आळंदी कडे रवाना झाला त्यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे उपस्थित भाविकांनी दर्शन घेऊन माऊलींना निरोप दिला.
आषाढी वारीसाठी प्रतिवर्षी पंढरपूर येथे दाखल होणाऱ्या संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊलींसह अन्य संतांच्या पालख्या गोपाळपूर येथील गुरु पौर्णिमेचा गोपालकाला झाल्यानंतर परतीच्या प्रवासास निघतात, माऊलीं पालखी सोहळा गोपाळपूर येथून निघून वाखरी येथे पोहोचतो तेथे माऊलींचा मुक्काम असतो. आषाढ वद्य तृतीयेस माऊलींचा येथील नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिरात सोहळ्याचा मुक्काम असतो, त्यावेळी फलटण व पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. यावर्षी आज गुरुवार दि. 2 रोजी पालखी सायंकाळी येथून रवाना झाली असून रात्री आळंदी येथे पोहोचणार आहे.