दैनिक स्थैर्य । दि. २५ जुलै २०२२ । मुंबई । राम रहमान बाजूला ठेवून अंधश्रद्धेतून बाहेर पडा असा संदेश देत तेराव्या शतकात अंधश्रद्धेच्या विरोधात संत कबीरांनी मोठा लढा देत क्रांती घडवली मानवतेच्या कल्याणासाठी आपल्या दोह्यातून तत्वनिष्ठ विचारांची पेरणी केली ते विचार आजही सद्यपरिस्थितीत लागू पडतात त्याच बरोबर सरसेनानी आनंदराज आंबेडकर आपल्या भाषणात पुढे असे म्हणाले की “तेराव्या चौदाव्या शतकात नाथपंथ आणि सुफिपंथ यांच्यावर तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा आणि धम्माचा प्रभाव होता प्रभाव संत कबीरांवर पडल्यामुळे त्यांनी आपल्या दोह्यात मानवी जीवन, अंधश्रद्धा आणि सामाजिक जडणघडण यावर आपले जे विचार मांडले आणि आपल्या दोह्यामधून ते व्यक्त केले अशा अनेक दोह्यांचे उदाहरण देऊन त्यांचा भावार्थ स्पष्ट केले, नदीमध्ये डुबकी मारणारा माणूसच वर येताना नदीतून काहीतरी घेऊन येतो परंतु पाण्याला घाबरून नदीकिनारी बसलेला माणूस काहीही करू शकत नाही असे अनेक उदाहरणं त्यांनी सर्वांसमोर मांडले, त्यासोबतच कबीरांनी सांगितलेले “कल करे सो आज कर आज करे सो अब” या विचारांची गरज सध्या युवा पिढीला आहे असे ही मत त्यांनी व्यक्त केले त्यासोबतच आज देशाची राष्ट्रपती आदिवासी महिला होऊ शकली हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि त्यांनी देशाला दिलेल्या संविधानाचा विजय आहे परंतु याच राष्ट्रपतींनी मी हे राष्ट्र हिंदुराष्ट्र बनवेल असे व्यक्तव्य मांडले त्यावर आपण चिंतन करणे आवश्यक आहे असेही मत त्यानी व्यक्त केले, संत कबीरांचे विचार देशाच्या विकासामध्ये मार्गदर्शक ठरतील असे वक्तव्य त्यांनी प्रवचन मालिकेच्या अध्यक्ष भाषणामधून मांडले.
बौद्धजन पंचायत समिती अंतर्गत संस्कार समिती विद्यमाने वर्षावास मालिका आयोजित करण्यात आली आहे या सदर कार्यक्रमास उपसभापती आदरणीय विनोदजी मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत साहेब, सरचिटणीस राजेश घाडगे साहेब, उपकार्याध्यक्ष अशोक कांबळे, एच. आर. पवार, मनोहर मोरे, अतिरिक्त सरचिटणीस रवींद्र पवार, चिटणीस श्रीधर साळवी, संदेश खैरे, साहित्य कलाक्रीडा समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गमरे, गटप्रतिनिधी तुकाराम घाडगे, निवडणूक मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जाधव, जनसंपर्क आणि प्रसिद्धी समितीचे अध्यक्ष रमेश जाधव आणि व्यवस्था मंडळाचे सर्व सभासद, विविध उपसमितीचे अध्यक्ष, चिटणीस, उपासक, उपासिका, बौद्धाचार्य, बौद्धचार्या आदी लोक बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी केला तर सूत्रसंचालनाची धुरा मनोहर बापू मोरे यांनी पेलवली.
कार्यक्रमाचे चौथे पुष्प शरद देशपांडे यांनी गुंफले त्यांनी आपल्या प्रवचनात म्हटल की “जन्म देताच ज्याला जन्मदात्री आईने नदीकाठी सोडून दिलं असा एक अनाथ अशिक्षित मुलगा ज्याच्यावर तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा आणि धम्माचा प्रभाव पडल्याने तो हिंदी संत साहित्यामधील महामेरू संत कबीर म्हणून नावलौकिकास आला, अशा संत कबीरांना प्रकांडपंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी आपले गुरू मानलं त्यामागचं कारण म्हणजे त्यांचा त्याग, त्यांनी केलेली क्रांती आणि त्यांनी आपल्या दोह्यातून मांडलेले विचार याचा अभ्यासपूर्वक विचार करूनच बाबसाहेबांनी त्यांना आपल गुरु मानल, संत कबीरांबद्दल अभ्यासपूर्ण व चिंतनशील माहिती देत त्यांच्या दोह्यांचे सादरीकरण करून या विचारांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन आपण त्याचा प्रचार आणि प्रसार करायला हवा असे विचार पाऊण तासाच्या आपल्या प्रवचनात त्यांनी मांडले व संत कबीरांचे संपूर्ण जीवन सादर करून सर्व उपस्थित जनसमुदायास मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सरचिटणीस मनोहर बापू मोरे यांनी सर्वांचे आभार मानून शेवटची गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.