
दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटण शहरातील पंचायत समितीसमोर असलेल्या हॉटेल ‘आनंद विलास’मध्ये दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास नाष्टा करीत असताना साहिल अहमद शेख (वय २३, रा. सोनवडी बु., ता. फलटण) यांच्या प्लेटमध्ये पाल सापडली. या प्रकरणी साहिल शेख यांनी हॉटेल चालकांसह आचारी यांच्याविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मुकूंद नारायण ढेरे (रा. गजानन चौक, फलटण), एकनाथ अर्जुनराव कापसे (रा. मलटण, फलटण) व हॉटेलचा आचारी अशी आरोपींची नावे आहेत.
या घटनेचा अधिक तपास स.फौ. संतोष कदम करत आहेत.