आजपासून सातार्‍यात सहस्रचंडी यागाला प्रारंभ

पंचपाळे हौद दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजन


स्थैर्य, सातारा, दि. 4 ऑक्टोबर : येथील श्री पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या तर्फे शनिवार दि.4 ऑक्टोबर पासून दि.10 ऑक्टोबर पर्यंत आयोजित केलेल्या सहस्त्रचंडी महायज्ञ सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शनिवार दि.4 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता या महायज्ञाला प्रारंभ होणार आहे .शनिवारी सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत प्रधान संकल्प गणपती पूजन, पुण्याहवाचन ,नांदी श्राद्ध ,आचार्य वरण ,प्रायश्चित्त होम ,गोपूजन ,स्थल शुद्धीसाठी उदकशांत ,मुख्य देवता स्थापना ,नवग्रह स्थापना, नवग्रह होम तसेच वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांचे सहस्त्रचंडी यागाचे महत्त्व या विषयावर प्रवचन होणार आहे .सकाळी नऊ वाजता यजमानांच्या हस्ते प्रधान संकल्प सोडून यागाला सुरुवात होईल .सकाळी नऊ वाजता यजमानांच्या हस्ते प्रधान संकल्प सोडून हा यज्ञ वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले, वेदमूर्ती ओंकार शास्त्री बोडस,वेदमूर्ती दिलीप शास्त्री आफळे यांच्यासह 50 हून अधिक सातारा शहर परिसरातील ब्रह्मवृंदांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.

यानिमित्त मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य मंडप आणि शामियाण्यात वेदींची तयारी पूर्ण झाली असून सोन्याच्या मुलांना दिलेल्या आकर्षक अशा प्रभावळीमध्ये प्रमुख देवतांची स्थापना केली जाणार आहे गजाराजांच्या पुढील भागात विराजमान झालेल्या मंडपामध्ये पालखी सोहळा ही संपन्न होणार असून यासाठी पालखीची विशेष फुलांची सजावट करण्यात आली आहे .मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे काम सातारा येथील भोसले मंडप डेकोरेटर्सच्या वतीने अतिशय सुरेखपणे करण्यात आलेले आहे.

मंदिर परिसरात विविध रंगांचे आकाश कंदील लक्ष वेधून घेणारे आहेत. तसेच या पूजा व महायज्ञ सोहळ्यासाठी लागणार्‍या पूजा साहित्याच्या तयारीसाठी वेदमूर्ती ओंकार शास्त्री बोडस ,वेदमूर्ती धनंजयशास्त्री कुलकर्णी ,वेदमूर्ती अतुलशास्त्री आपटे आदी ब्रह्मवृंद अहोरात्र परिश्रम घेत आहेत. संपन्न होणार्‍या यहा महायज्ञ सोहळ्यात सातारा जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी तसेच विविध मान्यवर भेट देणार असून छत्रपती घराण्याच्या श्री. छ. सौ दमयंतीराजे भोसले या प्रधान संकल्पना साठी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष धनंजय देशमुख यांनी दिली.

मंडप स्थळावर संकल्प सोडण्यासाठी विशेष चौरंगांची व्यवस्था करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून या यज्ञ सोहळ्यात सातारकरांनी 10 ऑक्टोबर पर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित लाभ उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे .महायज्ञ सोहळ्यानिमित्त शनिवार दि.4 ते सोमवार दि. 6 ऑक्टोबर दरम्यान श्री समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष समर्थ भक्त गुरुनाथ महाराज कोटणीस यांचे सुश्राव्य प्रवचन यानिमित्त सायंकाळी सहा वाजता पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिरा नजीकच्या श्री समर्थ सेवा मंडळाच्या समर्थ सदन येथे आयोजित करण्यात आले आहे.हा महायज्ञ सोहळा मोठ्या उत्साहाने आणि यशस्वी पार पडण्यासाठी सर्वच सातारकरांची तन-मन धन अर्पून केली जाणारी सेवा ही खरोखरच श्रद्धावान भक्तांसाठी एक अनोखी संधी असून या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

या यज्ञाच्या आयोजनासाठी दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख ,उपाध्यक्ष राजेंद्र साळुंखे ,सचिव शिवाजी उर्फ प्रशांत तुपे ,उपाध्यक्ष शिवाजी भोसले कोषाध्यक्ष प्रेमचंद पालकर यांचेसह हरीष शेठ, विनायक चिखलगे तसेच सर्व विश्वस्त व कार्यकारिणी सदस्य हितचिंतक विशेष परिश्रम घेत असून सहस्त्रचंडी महायज्ञ साठी भक्तांकरीता 80 जी कलमानुसार देणगीदारांना इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर खात्यातून सवलत मिळणार आहे तसेच या महायज्ञा साठी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह मंडळचे अध्यक्ष सुभाषराव बागल, माजी नगराध्यक्ष अशोकराव मोने, समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी ,प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर,सातारा शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे, महेश राजेमहाडिक, चंद्रशेखर ढाणे, प्रकाश बडदरे तसेच सर्व साधक, सनातनी संस्था सातारा यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.


Back to top button
Don`t copy text!