भाजपा युवा मोर्चाच्या अल्पसंख्याक सेलच्या युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षपदी सागर शहा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.३० जानेवारी २०२२ । फलटण । भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांकच्या युवा मोर्चाच्या फलटण तालुका अध्यक्षपदी उद्योजक सागर शहा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष एजाज देशमुख यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र सागर शहा यांना मुंबई येथे दिले.

मुंबई येथे भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक सेलच्या वतीने युवा मोर्चाच्या फलटण तालुका अध्यक्षपदी सागर शहा यांची निवड करण्यात आली. यावेळी जमाल सिद्दिकी, अनुप शहा, अतिक खान यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळामध्ये फलटण तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अल्पसंख्यांक घटकांची विविध प्रलंबित कामे व अल्पसंख्यांकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कार्यरत राहू असेही शहा यांनी यावेळी स्पष्ट केले.

सागर शहा यांच्या निवडीबद्दल माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते व युवा नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप शहा, भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, फलटण शहर अध्यक्ष अमोल सस्ते यांच्यासह फलटण तालुक्यातील विविध पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!