स्थैर्य, औंध, दि. २५ : औंध येथील वीज वितरण कंपनी कार्यालयातील उपअभियंता सुभाष घाटोळ यांना रयत क्रांती संघटनेचे सागर जगदाळे व शेतकऱ्यांनी लेखी निवेदन देऊन वीज वितरण कंपनी कार्यालयामार्फत सुरू असलेली शेती पंपाची वीज कनेक्शन तोडणी त्वरित थांबवावी अशी मागणी केली.
यावेळी सागर जगदाळे व शेतकऱ्यांनी सध्या शेतकरी अडचणीत असल्याची माहिती देऊन मोठ्या प्रमाणात पिके वाळून चालली असल्याची माहिती देऊन याबाबत वीज कर्मचाऱ्यांनी शेती पंप कनेक्शन त्वरित जोडावीत अशी मागणी केली तसेच याबाबत योग्य कार्यवाही न झाल्यास शेतकऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी शेतकऱ्यांनी विविध समस्या घाटोल यांच्या समोर मांडल्या.
यावेळी बोलताना उपअभियंता सुभाष घाटोळ म्हणाले की, शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे.सर्व शेतकऱ्यांची वीज कनेक्शन पूर्ववत जोडली जातील .त्यासाठी वीज मंडळाच्या वीज बिल वसुलीस सहकार्य करावे तसेच शेती पंपासाठी मिळणाऱ्या विविध योजनांचा तसेच कूषी सन्मान योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले व शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण केले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.