दैनिक स्थैर्य । दि. ०६ डिसेंबर २०२२ । गोखळी । दिव्यांग, विधवा, परित्यक्ता महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत मिळवून दिली देत अपंगांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून संघटित करून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी अपंग, दिव्यांग क्षेत्रात सागर गावडे करीत असलेले काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बजरंग गावडे यांनी केले.
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथे जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान फलटण पंचायत समिती अंतर्गत जय किसान महिला ग्राम संघ गोखळी शाखेचे उद्घाटन सरपंच सुमनताई गावडे यांच्या हस्ते जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने करण्यात आले यावेळी बजरंग गावडे बोलत होते.
प्रारंभी फलटण पंचायत समिती ग्रामीण जीवन ज्योती अंतर्गत जय किसान महिला ग्राम संघ, गोखळी या कार्यालयाचे उद्घाटन सरपंच सुमंत गावडे यांच्या हस्ते फीत कापून झाले. यावेळी सातारा जिल्हा परिषद सदस्या उषादेवी गावडे, जीवन ज्योती अभियानाच्या संजना आटोळे, प्रभाग समन्वयक पल्लवी पोळ, प्रहार अपंग संघटनेचे तालुकाध्यक्ष बापूराव खरात, गोखळी विकास सोसायटीचे चेअरमन तानाजी बापू गावडे, गवळीबुवा विकास सोसायटीचे चेअरमन अक्षयकुमार गावडे, हनुमान विकास सोसायटीचे चेअरमन निवृत्ती कदम उपस्थित होते.
गावडे पुढे म्हणाले, गावातील अपंगांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे हेतूने आम्ही नवयुवक मंडळाच्या माध्यमातून एका पायाने अपंग असलेल्या ज्ञानदेव काशीद यांना केस करताना लय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करून स्वतःच्या पायावर उभे केले. तसेच दुसरे एका पायाने अपंग असलेले नाता हरिहर यांना ग्रामपंचायतीवर पाठवण्याचा प्रयत्न केला. अपंगांना सामाजिक प्रतिष्ठा मिळाली पाहिजे हा या पाठीमागचा हेतू होता. आज जागतिक पातळीवर संपूर्ण जगात दिव्यांग दिन साजरा होत आहे. आम्ही सुरू केलेल्या ४० वर्षांपूर्वी सुरू केलेल्या कार्याचा हा विस्तारच आहे असे म्हटले तर वावगे नाही, असे गावडे यांनी सांगितले.
यावेळी तानाजी बापू गावडे म्हणाले की, जीवन ज्योती अभियान महाराष्ट्र राज्य तालुकाप्रमुख संजना आटोळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधेश्याम जाधव यांनी केले. कार्यक्रमास तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज गावडे, माजी सरपंच नंदकुमार गावडे, पोलीस पाटील विकास शिंदे माजी सरपंच रघुनाथ ढोबळे, राधेश्याम जाधव अभिजीत जगताप, आबासो मदने, छाया जाधव, कुसुम गवळी सविता शिंदे, ग्राम संघ अध्यक्ष मीना शिंदे, सोनाली शिंदे, सुनील अप्पा गावडे, योगेश गावडे पाटील, दीपक चव्हाण, डॉ. अमित गावडे, पांडुरंग गावडेसह गोखळी आणि पंचक्रोशीत दिव्यांग, विधवा, परित्यक्ता, अपंग, महिला मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.