दैनिक स्थैर्य । दि. २५ जुलै २०२२ । मुंबई । सेफेक्स केमिकल्स या देशातील आघाडीच्या कृषीरसायन कंपनीने आर्थिक वर्ष २१ दरम्यान ७८२ कोटी रूपयांच्या महसूलाची नोंद करत भव्य विकास संपादित केला आहे. मागील १२ वर्षांमध्ये सर्वात लक्षणीय वाढ संपादित करत कंपनीचा आता या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत १०० कोटी मूल्य असलेली कंपनी बनण्याचा दृष्टीकोन आहे.
महामारीच्या सुरुवातीपासून मोठ्या प्रगती आणि उत्पादन विकासासह सेफेक्सने आपली अपवादात्मक व्यवसाय गती कायम ठेवली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २० मध्ये देखील ७०२ कोटी रूपयांच्या प्रभावी महसूल वाढीची नोंद केली. कृषीरसायन उद्योगामधील सर्वात प्रतिष्ठित नाव म्हणून उदयास येण्याच्या मनसुब्यासह कंपनीने स्थापनेपासून मागील १२ वर्षांत महसूलामध्ये २१ पट वाढ आणि कार्यसंचालन नफ्यामध्ये ३२ पट वाढ नोंदवली आहे.
सेफेक्स केमिकलसचे संस्थापक व संचालक श्री. एस. के. चौधरी म्हणाले, “आमच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, सर्वोत्तम उत्पादने, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आणि बांधिलकी यांच्या आधारावर जवळपास २९ वर्षांपासून भारतात पीक उत्पादकता व पीक संरक्षण वाढवण्यात सेफेक्सचा महत्त्वाचा वाटा आहे. यामुळे आम्हाला देशाची अन्न सुरक्षा, जीवनाचा दर्जा आणि आरोग्य परिस्थितीमध्ये मोठे योगदान देण्यास मदत झाली आहे. आपल्या अनेक वर्षांच्या अथक परिश्रमाचे असे उल्लेखनीय फळ मिळताना पाहणे अत्यंत आनंददायी आहे. आमचा कार्यप्रवाह विकसित करून अशी उल्लेखनीय व प्रेरणादायी वाढ संपादित केल्यानंतर आम्ही आता या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत चांगले परिणाम साध्य करण्यासाठी कौशल्य वृद्धी आणि सतत कर्मचारी प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करत आहोत.”
कृषी-रसायन क्षेत्राने हवामान बदल (अनियमित पावसाळा) अशा अनेक आव्हानांदरम्यान अन्न सुरक्षा प्रक्रियेचे प्रभावी व्यवस्थापन राखण्यासाठी स्थिरता निर्माण करण्याच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ पाहिली आहे. ज्यामुळे आर्थिक वर्ष २२ मध्ये मागणीचा अंदाज करता येऊ शकत नाही. देशव्यापी/राज्यव्यापी लॉकडाऊन व परिणामी कामगार टंचाई, कर्मचा-यांमध्ये काम पुन्हा सुरू करण्याची भीती, पुरवठा साखळीची चिंता, महागाई आणि वस्तूंच्या किंमतीत झालेली वाढ यामुळे पुरवठा साखळी कृतींवर परिणाम होऊन जागतिक महामारीने आणखी काही गंभीर अडथळे निर्माण केले.