पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या परिवाराला एक कोटीची मदत द्या – सादिक खाटीक यांची सरकारकडे मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ फेब्रुवारी २०२३ । आटपाडी । पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या वयोवृद्ध माता आणि त्यांचा १९ वर्षीय मुलगा यांच्या परिवाराला राज्य सरकारने तातडीने एक कोटीची मदत द्यावी असे मागणी आटपाडीचे ज्येष्ट पत्रकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी केली आहे.

गाडी अंगावर घालून ठार केले गेलेले रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील कशेळे गावचे पत्रकार शशिकांत वारिशे यांची कौंटूबीक आर्थिक स्थिती अत्यंत जेमतेम आहे . ७५ वर्षाच्या वयोवृद्ध आजारी आई आणि १९ वर्षीय मुलगा एवढाच मर्यादित परिवार असलेल्या शशिकांत वारिशे यांच्या पत्नीचे फार पूर्वी निधन झाले आहे . पत्रकार वारिशे यांच्या माघारी कमवते कोणीच नसल्याने त्यांच्या परिवारावर दारुण संकट ओढावले आहे . वयोवृद्ध आई आणि मुलाच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने एक कोटी ची मदत द्यावीच, तथापी त्यांच्या जुन्या अडगळीतल्या घराच्या जागी नवीन घर बांधून द्यावे . अधिस्विकृती धारक पत्रकाराला दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती पत्रकार वारीशे यांच्या परिवाराला द्याव्या, तसेच वयोवृद्ध आईच्या औषधोपचाराची, मुलाच्या शिक्षणाची शासनाने खास बाब म्हणून सर्व व्यवस्था करावी . अशी मागणी करून सादिक खाटीक यांनी , सोमवार दि . ६ फेब्रुवारी २०२३ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या दुचाकीला अपघात झाला. हा अपघात रिफायनरी समर्थक पंढरी आंबेरकर याने केल्याची परिसरात जोरदार चर्चा आहे. पंढरी आंबेरकर याने स्वतःच्या मालकीची चार चाकी शशिकांत वारीशे यांच्या दुचाकीवर घातली, त्यामुळे शशिकांत वारीशे गंभीर जखमी झाले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला , असा आरोप करण्यात आला आहे. हा अपघात नसून हा घातपात आहे, असा संशय वारीशे यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

पत्रकार शशिकांत वारीशे हे सरकारने प्रस्तावित केलेली महाप्रदूषणकारी पेट्रो केमिकल ऑईल रिफायनरी कोकणात होऊ नये, प्रदूषणापासून एकंदरीत कोकणाचे संरक्षण व्हावे आणि त्या रिफायनरीमुळे राजापुरातील जवळ जवळ सर्व कुणबी समाज उद्ध्वस्त होणार होता आणि तो होऊ नये तसेच स्थानिक जनतेची रिफायनरी विरोधाची असलेली भूमिका लेखणीतून मांडत होते. याचाच राग मनात ठेवून पंढरी आंबेरकर याने कारने धडक देवून त्यांची हत्या केली, असा आरोप करण्यात येत आहे. पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खुन्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, या खुनाची सखोल चौकशी व्हावी . जलदगती न्यायालयात हा खटला चालवून खुन्याला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाने नामवंत वकील हा खटला लढण्यासाठी उभे करावेत. असे ही सादिक खाटीक यांनी मुख्यमंत्री महोदयांना केलेल्या ईमेल द्वारे विनंती व मागणी केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, आमदार जयंतराव पाटील, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अॅड मोहंमद खान पठाण, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष श्री . एस .एम . देशमुख, उपाध्यक्ष शिवराज काटकर यांना ही ईमेलद्वारे या मागणीचे पत्र पाठविण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!