अनंत अडचणीत पारदर्शी व काटकसरीने सद्गुरू पतसंस्था कार्यरत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. ०५ : गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार उडाला होता. याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर मोठा परिणाम झालेला आहे. त्याचा फटका सहकार क्षेत्रालाही बसलेला आहे. पतसंस्थांची वसुली करताना अनंत अडचणी आल्या अशाही परिस्थितीत सद्गुरू पतसंस्थेने पारदर्शी व काटकसरीने काम करीत उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रयत्न करून सभासदांना आठ टक्के लाभांश देत आहे. ही खरोखरच आजच्या परिस्थितीत कौतुकाची बाब ठरेल असे प्रतिपादन सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी केले.

श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या; फलटण या संस्थेच्या ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष स्थानावरून भोसले बोलत होते. याप्रसंगी चेअरमन तेजसिंह भोसले, व्हा.चेअरमन राजाराम फणसे, तुषार गांधी, अ‍ॅड. सौ. मधुबाला भोसले, अभिषेक फणसे, विक्रांत कदम, सुभाष आढाव व इतर संचालक उपस्थित होते.

दिलीपसिंह भोसले म्हणाले कि, सन २०२० – २१ हे वर्ष सुद्धा फार अडचणीचे ठरत आहे. काटकसर प्रामाणिकपणा जपत संस्थेच्या वाढीसाठी आपण प्रयत्नशील आहोत. शाखांचे कामकाज चांगल्या पद्धतीने व उद्दिष्टांची पूर्तता व्हावी. यासाठी शाखांना आपण प्रोत्साहनपर बक्षिसेही देत आहोत. बहुतांश प्रमाणात प्रॉपर्टी ही पुरुषांच्या नावावर असल्याने महिला पतसंस्था अशा परिस्थितीत चालविणे अडचणीचे ठरत आहे. यामुळे फलटण शहरातील महिलांसाठी कार्यरत असणारी नामांकित स्वयंसिद्धा पतसंस्था ही आपण सद्गुरू पतसंस्थेत विलीन करण्याचा निर्णय घेत आहोत. ज्यामुळे सभासदांचे हित निश्चितच जोपासले जाईल.

प्रास्ताविक व स्वागतामध्ये चेअरमन तेजसिंह भोसले यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. अनंत अडचणी असुनही संस्थेने नावलौकीक कायम ठेवला आहे. संस्थेकडे ५० कोटी ३४ लाख ठेव असुन ३७ कोटी ६६ लाख रुपये कर्जवाटप झालेली आहे. संस्थेस आर्थिकवर्षात  ५२ लाख ७३ हजार रूपये नफा झाला असुन सभासदांना आठ टक्के लाभांश दिला जाणार आहे. प्रारंभी प्रतिमा पुजन आणि श्रध्दांजली अर्पण केल्यावर सभेच्या मुख्य कार्यक्रमास सुरवात झाली.

संस्थेचे सरव्यवस्थापक संदिप जगताप यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सर्व विषय एकमताने मंजुर करण्यात आले. संचालक अभिषेक फणसे यांनी आभार मानले. सदर सभेसाठी ठेवीदार, कर्जदार, सभासद, उपस्थित होते. सोशल डिस्टंसिंग व कोरोना संबंधीचे नियमास अधीन राहून सभा संपन्न झाली.


Back to top button
Don`t copy text!