सदाशिव खरात यांचे निधन


स्थैर्य, सातारा, दि. 15 नोव्हेंबर : येथील फलटण पंचायत समितीमधील निवृत्त विस्तार अधिकारी सदाशिव यशवंत खरात (वय 82) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

मालोजीनगर, कोळकी ता. फलटण येथील किशोरसिंह गृह निर्माण सोसायटीयचे चेअरमन, फलटण तालुका सेवानिवृत्त संघटनेचे फलटण तालुका अध्यक्ष अशी पदे भूषविली होती. त्यांचे कलेढोण (मायणी) हे होते. परंतु ते कोळकी ता. फलटण येथे स्थायीक झाले होते. खरात साहेब या नावाने ते सर्वत्र परिचित होते. त्यांनी सातारा, दहिवडी येथे काम पहिले. फलटण पंचायत समिती येथे जवळपास पंचवीस वर्षे ते कार्यरत होते. विस्तार अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी सेवानिवृत्त संघटनेच्या कार्याला वाहून घेतले होते. सेवानिवृतांचे प्रश्न, समस्या मांडण्यात व सोडविण्यात ते नेहमीच अग्रस्थानी राहिले. त्यांचा जनसंपर्क प्रचंड मोठा होता. त्यांच्या मागे मुलगा, सुन, नातू, व मुली असा परिवार आहे.


Back to top button
Don`t copy text!