सदाभाऊंचा सरकारवर घणाघात; शेतक-यांना मदत म्हणजे काेपराला गूळ लावून हाताने चाटणं


 

स्थैर्य, सातारा, दि.८: काेराेनाच्या संकटात शेतकरी उध्वस्त झाला आहे. यंदा दिवाळी ही शेतक-यांची कडू झाली आहे. सरकारने दहा हजार काेटीचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यामधून ग्रामीण रस्ते, पाटबंधारे, पाणीपूरवठा विभाग या सर्वांना निधई विभागून दिला ाहे. शेतक-यांच्या वाट्याला केवळ पाच हजार काेटी येतील हे म्हणजे काेपराला गूळ लावायचा आणि हातानं चाटायचा अशीच राज्य सरकारची शेतक-यांना मदत आहे अशी घणाघाती टीका माजी मंत्री सदाभाऊ खाेत यांनी क-हाड येथे नुकतीच केली.

ते म्हणाले, राज्यसरकारकडून देण्यात येणारी मदत ही शेतक-यांवर अन्याय करणारी आहे. फळलागवड असणा-या शेतक-यांला प्रतिहेक्टरी एक लाख रुपये देणे आवश्यक आहे. बागायत उत्पादक शेतक-यांना 50 हजार तर काेरडवाहूसाठी 25 हजार रुपये देणे आवश्यक आहे. 

दिवाळी ताेंडावर आली आहे. त्यामुळे घाेषणा नकाे तर लवकर मदत देवून राज्यसरकारने मेहरबानी करावी असेही खाेत यांनी नमूद केले. दरम्यान सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती राज्य सरकारच्या वर्मावर बाेट ठेवून बाेलत असेल तर त्यांच ताेंड बंद करण्यासाठी जून प्रकरण उकरुन काढून अटक केली जात आहे. राज्यामध्ये अशी कितीतरी प्रकरण आहेत. ज्यांच्या चाैकशी वर्षानुवर्षा चाललेल्या आहेत परंतु त्यावर ठाेस कारवाई हाेत नाही असेही खाेत यांनी नमूद केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!