सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण; झाले क्वारंटाईन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई : देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. अगदी सर्वसामान्यांपासून राजकीय मंडळींना सुद्धा कोरोनाची लागण होण्याचं सत्र सुरूच आहे. अशातच सदाभाऊ खोत यांनीही कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यांची कोरोनाची चाचणी सकारात्मक आली आहे. त्यांची प्रकृती चांगली असून, त्यांनी स्वत: विलगीकरणात गेले आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.

त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर लिहले आहे की, ‘मी कोरोनाची चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. मला कोरोनाची लक्षणे नसली तरी मी, स्वतः विलगीकरणात जात आहे. तरी आपण आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी, गणरायाच्या व आपल्या सर्वाच्या आशिर्वादाने मी लवकरच बरा होऊन, आपल्या सेवेत हजर राहिन.’ असा संदेश सदाभाऊ खोत यांनी लिहला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!