दैनिक स्थैर्य | दि. २५ डिसेंबर २०२४ | बारामती |
बारामती तालुक्यातील घाडगेवाडी येथील निवृत्ती (तात्या) दादासो तुपे यांचे मंगळवार, दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
तुपे हे प्रगतीशील शेतकरी म्हणून ओळखले जात होते. घाडगेवाडी परिसरातील आध्यात्मिक क्षेत्रामध्येही ते कार्यरत होते.
त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, नातू, परतुंड, सुना असा परिवार असून बारामती सहकारी बँकेचे संचालक नामदेवराव तुपे, सर्जेराव तुपे, भाऊसाहेब तुपे यांचे ते वडील होत.