गॅलेक्सीच्या चेअरमनपदी सचिन यादव तर व्हाईस चेअरमनपदी योगेश यादव बिनविरोध

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 18 एप्रिल 2025 | फलटण | अल्पावधीतच समाजातील आर्थिक हितसंबंध जोपासण्याच्या उद्दिष्टाने उभारलेल्या गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट संस्थेने आपल्या पंचवार्षिक निवडणुकीत नव्या नेतृत्वाची नियुक्ती करून एका नवीन वाटचालीची सुरुवात केली आहे. या निवडणुकीत सचिन बबनराव यादव यांची पुन्हा एकदा चेअरमन पदी एकमताने निवड झाली असून, योगेश रघुनाथ यादव यांची व्हाईस चेअरमन पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट संस्थेची पंचवार्षिक निवडणूक १६ एप्रिल २०२५ रोजी अध्यासी अधिकारी, सहाय्यक निबंधक जे. पी. गावडे व शेखर साळुंखे यांच्या उपस्थितीत पार पडली. सचिन यादव हे यापूर्वीही संस्थेच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील संस्थेने अल्पावधीतच अनेक नवीन उच्चांक प्रस्थापित केले आहेत.

संस्थेने गेल्या आर्थिक वर्षात ७५ कोटींचा एकत्रित व्यवसाय करून जिल्ह्यातील इतर संस्थांपुढे आदर्श ठेवला. त्याचबरोबर, संस्थेचा एनपीए (Non-Performing Assets) २% पेक्षा कमी ठेवण्यात यश मिळवले आहे, ज्यामुळे सभासदांच्या आर्थिक स्थैर्यात नकारात्मक प्रभाव पडू नये.

संस्थेचे संचालक पदी संदीप मोहनराव शिंदे, गणेश हणमंतराव निकम, हेमंत बाळासाहेब खलाटे, अशांत हनुमंत साबळे आणि संदीप राजू लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली. पिंपरी चिंचवड येथे स्थापन केलेली नवीन शाखा अत्याधुनिक बँकिंग सुविधांनी सजलेली असून, ५० नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातही संस्थेने आपले कार्यक्षेत्र सामावून घेतले आहे.

सचिन यादव यांनी त्यांच्या उद्यमशील दृष्टीसह सहकार क्षेत्रात उतरले आहेत. त्यांनी केबी ग्रुप कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करून गॅलेक्सी संस्थेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचा प्रयास केला. यामुळे संस्था सर्वसामान्य कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षा व स्थैर्य प्रदान करण्याच्या मार्गावर आहे.


Back to top button
Don`t copy text!