दैनिक स्थैर्य | दि. २९ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
मुंजवडी (ता. फलटण, जि. सातारा) येथील सचिन पांडुरंग ठणके हा ३५ वर्षांचा तरुण दि. २२ फेब्रुवारी २०२४ पासून राहत्या घरातून निघून गेल्याची तक्रार त्यांचे बंधू तुषार ठणके यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
सचिन ठणके हे रंगाने गोरे, केस कुरळे लांब, उंची ६ फूट २ इंच, अंगाने सडपातळ, अंगात पांढर्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट, पायात पॅरागॉनची चप्पल, मराठी भाषा अडखळत बोलणे व डोक्याने मतिमंद आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास मुंजवडी येथील राहत्या घरातून सचिन ठणके हे वडील पांडुरंग यांच्यासोबत शाब्दिक बाचाबाची झाल्याने घरात कोणासही काहीएक न सांगता निघून गेले आहेत. त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. सचिन ठणके यांच्याबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास त्यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या क्र. २१६६-२२२५३३ व ९८८१४९८९९० यावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.