
दैनिक स्थैर्य | दि. १५ फेब्रुवारी २०२५ | फलटण | माजी आमदार दिपक चव्हाण यांनी नुकत्याच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विद्यमान आमदार सचिन पाटील यांच्या कामकाजावर टीका केली. यावेळी त्यांनी असे मत व्यक्त केले की विद्यमान आमदार सचिन पाटील यांच्याकडून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे.
माजी आमदार दिपक चव्हाण यांनी स्पष्ट केले की विद्यमान आमदार सचिन पाटील यांना पुढील ६ महिने फक्त नारळ फोडणे एवढेच कामकाज राहिले आहे. ते म्हणाले, “अधिकाऱ्यांनी नियमात राहून काम करा, अन्यथा तुम्हाला समजेल या भाषेत आम्ही उत्तर देऊ. विद्यमान आमदार यांना आता फक्त आम्ही केलेल्या कामांचे नारळ फोडणे एवढेच कामकाज राहिले आहे.”
नुकतीच विद्यमान आमदार सचिन पाटील यांनी फलटण बसस्थानक अद्यावत करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेचे स्वागत करूनही, माजी आमदार दिपक चव्हाण यांनी त्यामागील वास्तविकता उघड केली. ते म्हणाले, “जर फलटण बसस्थानक अद्यावत होणार असेल तर त्याचे स्वागतच आहे. परंतु आताचे जे बसस्थानक आहे त्याची अवस्था अतिशय दयनीय होती. या बसस्थानकाला निधी देण्याचे काम हे श्रीमंत रामराजे यांनी केले आहे. हे सुद्धा विद्यमान आमदार सचिन पाटील यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.”
माजी आमदार दिपक चव्हाण यांनी असे स्पष्ट केले की नारळ फोडत असताना सुद्धा ते कामकाज राजे गटाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यांनी याची जाणीव ठेवण्याची गरज अधोरेखित केली. यावेळी पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता (बापू) अनपट, माजी नगरसेवक किशोर नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.