मुंबई उपनगरच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी सचिन ढोले; पद्दोनतीने नियुक्ती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 23 एप्रिल 2025 | फलटण | फलटणचे माजी प्रांताधिकारी सचिन ढोले यांची मुंबई उपनगराच्या अप्पर जिल्हाधिकारी पदी पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.

सचिन ढोले यांची कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख आहे. त्यांनी फलटण येथे प्रांताधिकारी असताना केलेल्या कामकाजाची आठवण सुद्धा फलटणकर नागरिक काढत असतात. त्यांच्या कार्यकाळात प्रांताधिकारी कार्यालय हे सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी कायम खुले असायचे.

अगदी एकदा सर्वसामान्य नागरिक जर कोणतीही अडीअडचण घेऊन प्रांताधिकारी कार्यालयात आला तर ऑफिसच्या पायरीवर सुद्धा प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना कधीही कमीपणा वाटत नव्हता.

सचिन ढोले यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केले होते. त्याबद्दल सर्व निवडणूक कर्मचारी यांनी त्यांच्या कार्याबद्दल कौतुक केले होते.

त्यांनी यापूर्वी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज केले आहे.


Back to top button
Don`t copy text!