सचिन अहिवळे मित्र परिवाराकडून ‘एमपीएससी’ परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३१ जुलै २०२३ | फलटण |
माढ्याचे खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या आदेशाने व फलटण नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक श्री. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक सचिन अहिवळे मित्र परिवाराकडून ‘एमपीएससी’ परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व वंदना घेऊन सुरू करण्यात आला.

या कार्यक्रमातील सत्कारमूर्ती असे : प्रसाद मधुकर काकडे (सहाय्यक सरकारी अभियोक्ता अधिकारी वर्ग १), शितल किरण भोसले (सहाय्यक सरकारी अभियोक्ता अधिकारी वर्ग १), वर्षा अमोल सोनवणे (सहाय्यक सरकारी अभियोक्ता अधिकारी वर्ग १), प्राचार्य वर्धमान अहिवळे (विधी लॉ पी.एचडी.), मिलिंद दत्ता अहिवळे (दूतावास अ‍ॅाफीस थायलंड), शंकेश्वर हणुमंत अहिवळे (पोलीस उपनिरीक्षक), मोहिनी विजय जाधव (पोलीस उपनिरीक्षक), अजय सुनिल मिसाळ (पोलीस उपनिरीक्षक), सनी विनायक बनसोडे (उद्योग निरिक्षक), संकेत कुमार भंडलकर (मंत्रालय क्लार्क).

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता भोसले यांनी केले व प्रस्तावना विशाल पाटील यांनी केली. यावेळी जे. एस. काकडे (माजी वॉरंट अ‍ॅाफिसर), जयकुमार शिंदे (भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य), विजय येवले (आरपीआय जिल्हा सचिव), मधुकर काकडे (माजी नगरसेवक), दत्ता सर अहिवळे (माजी नगरसेवक), सचिन अहिवळे सर (माजी नगरसेवक), सचिन कांबळे पाटील (फलटण कोरेगाव मतदारसंघ, प्रभारी भाजप), बी. टी. जगताप (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ अध्यक्ष), बाळासाहेब काशिद, रियाज इनामदार, राजाभाऊ मारूडा (आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष), संजय निकाळजे, सुनिल अहिवळे, प्रजन्य अहिवळे, सतिश अहिवळे (तालुकाध्यक्ष आरपीआय), लक्ष्मण अहिवळे (शहराध्यक्ष आरपीआय), उमेश (नाना) कांबळे (वंचित शहराध्यक्ष), रोहित अहिवळे, सचिन मोरे, सागर चव्हाण, शितल अहिवळे, सनी मोरे, मुकेश अहिवळे, अमोल(पिंटू) अहिवळे, विशाल(दादा) काकडे, गणेश निकाळजे, गोंविद काकडे, गणपत अहिवळे, चंद्रकांत मोहिते, बापू ढावरे, सुधीर अहिवळे, विमलताई काकडे (आरपीआय महिला तालुकाध्यक्ष), राखीताई कांबळे (आरपीआय शहराध्यक्ष) यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार सचिन भोसले यांनी मानले व शरणनते घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.


Back to top button
Don`t copy text!