दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२३ । मुंबई । राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत भाजपाची स्तुती सुरु केली होती. तेव्हा मध्येच ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी रोखले व भाजपाचे आमदारही त्यागच करत असल्याचे म्हटले. यावरून सचिन अहिर देखील लवकरच भाजपात दिसलील, अशी इशारावजा घोषणाच मुनगंटीवार यांनी केली आणि चर्चा सुरु झाल्या.
आमच्या पक्षामध्ये त्याग, तपस्या, बलिदान… यही भाजप की पहचान, असे मुनगंटीवर म्हणत होते. त्यानंतर विरोधी बाकांवरून 105 आमदार सध्या त्यागच करतायत असा खोचक टोला अहिर यांनी लगावला होता. यावर प्रतिक्रिया देताना सचिनभाऊ मी आज एक भविष्यवाणी करतो. एक दिवस सचिन अहिरसुद्धा भाजपसोबत असतील. मी गंमत नाही करत, मी गांभीर्यानं सांगतोय, असे मुनगंटीवार म्हणाले.
अनिल परबांची अवस्था महाभारतातल्या अश्वत्थामासारखी नाही झाली, तर माझं नाव बदला असा इशारा मुनगंटीवार यांनी दिला. नियम न पाहता समोरच्याला बोलूच द्यायचं नाही, मग एकेदिवशी पक्ष मायक्रोस्कोपमध्ये पहावा लागतो असा देखील टोला परबांना लगावला.