दैनिक स्थैर्य | दि. २८ ऑक्टोबर २०२१ | सातारा | एस. टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करावे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करुन थकबाकीची रक्कम एकरकमी दिवाळीपूर्वी देण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र एस. टी. कामगार संयुक्त कृती समिती सातारा विभागच्यावतीने विभाग नियंत्रण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले.
दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, थकीत महागाई भत्ता मिळालाच पाहिजे. वाढीव घरभाडे ८,१६,२४ च्या दराने मिळालेच पाहिजे, सण उचल १२५00 रुपये मिळालीच पाहिजे, दिवाळी बोनस १५ हजार रुपये मिळाले पाहिजेत, दिवाळीपूर्वी कामगारांना आर्थिक लाभ मिळालाच पाहिजे, न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ठरलेल्या तारखेस नियमीत वेतन मिळालेच पाहिजे, कामगार कराराप्रमाणे सर्व कामगारांना नियमीत वेतन मिळालेच पाहिजे, ठरल्याप्रमाणे वार्षिक वेतन वाढीचा दर २ टक्के ऐवजी ३ टक्कयाप्रमाणे वाढवून मिळालाच पाहिजे, आदी मागण्या करण्यात आल्या.