कोरोना वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर एस. टी. ने सुरक्षीत प्रवासाची दिली हमी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

एस. टी. बसमध्ये तिकीट देण्यापूर्वी प्रवाशाला सॅनिटायझर देऊन त्यांचे स्वागत करताना श्रीपाल जैन

स्थैर्य, फलटण दि.३०: कोरोना महामारी मुळे सर्वांना आपल्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त झाले आहे, त्याचबरोबर कामानिमित्त प्रवास अनिवार्य असल्याने महाराष्ट्राची जीवन वाहिनी एस. टी. ने प्रवाशांना सुरक्षीत व आरोग्यदायी प्रवासाची हमी देत विविध मार्गावरील प्रवासी वाहतूक सुरु केली आहे.

प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या सर्व बसेस एस. टी. महामंडळाच्या माध्यमातून स्वच्छ करणे, सॅनिटाईज करणे याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात आहे. प्रत्येक आगारातील प्रशासनाला त्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत, त्यामुळे बसेस सॅनिटाईज करुनच मार्गावर पाठविल्या जात असल्याचे फलटण आगार व्यवस्थापक नंदकुमार धुमाळ यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

या पार्श्वभूमीवर फलटण आगारातील वाहक श्रीपाल जैन बसमधील प्रवाशांना तिकीट देण्यापूर्वी त्यांच्या हातावर सॅनिटायझर देऊन मगच तिकीटे देत आहेत त्यामुळे प्रवासी निर्धास्तपणे प्रवास करताना दिसून येत आहेत. 

वाहक जैन यांच्या या कामगिरीबद्दल विभाग नियंत्रक सागर पळसुले, आगार व्यवस्थापक नंदकुमार धुमाळ, स्थानक प्रमुख राजेंद्र वाडेकर, वाहतूक निरीक्षक दत्तात्रय महानवर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक धीरज आहिवळे, नंदकुमार सोनवलकर यांनी श्रीपाल जैन यांचे अभिनंदन करताना सर्वच चालक/वाहकांनी विशेष खबरदारी घेऊन आपले व प्रवाशांचे आरोग्य सांभाळावे असे आवाहन केले आहे. तसेच प्रवाशी बंधू-भगिनी यांनी निर्धास्त पणे एस.टी.बसने प्रवास करावा असे आवाहन केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!