स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१९: भारत-चीन तणाव सुरू असतानाच रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला. यावेळी दोन्ही नेत्यांत विशेष आणि विशेषाधिकार असलेली सामरिक भागीदारी अधिक बळकट करण्याबोबररच अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. या शिवाय कोरोना महामारीच्या काळातही दोन्ही देशांतील संवाद कायम राहिला. यावरही दोन्ही नेत्यांनी आनंद व्यक्त केला.
विशेष म्हणजे भारत-चीन तणाव प्रचंड वाढलेला असतानाच दोन्ही देशांच्या नेत्यांत चर्चा झाल्याने, या चचेर्ला अधिक महत्व आहे. मात्र, या नेत्यांत चीनवर काही चर्चा झाली, की नाही. यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी, दोन्ही देशाचे संबंध बळकट करण्याच्या दृष्टीने वैयक्तीक पुढाकारासाठी पुतीन यांचे कौतुक केले. तसेच त्यांना द्विपक्षीय चचेर्साठी भारतात येण्याचे निमंत्रणही दिले. दोन्ही देश या चचेर्साठी तारीख निश्चित करतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. याशिवाय एससीओ आणि ब्रिक्स संमेल यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल मोदींनी पुतीन यांचे अभिनंदनही केले.
चीनचे रशियाबरोबरचे संबंधही ठीक नाहीत. रशियाने नुकतेच चीनला हवे असलेले एस-400 सरफेस टु एअर मिसाईल सिस्टिमदेणे टाळले. दक्षीण चीन समुद्रावरील आपल्या दाव्याबरोबरच अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरून चीनवर टीका होत असतानाच, रशियाने, असा निर्णय घेतल्याने त्याला विशेष महत्व आहे. रशिया आणि चीन यांच्या संबंधात 2014नंतर सुधारणा झाली होती. मात्र, आता पुन्हा बीजिंग और मॉस्को यांच्यातील संबंध दुरावल्याचे दिसत आहे. रशियाने नुकताच आपल्या एका आर्कटिक रिसर्चरवर विश्वासघाताचा आरोप करत, त्याने अत्यंत महत्वाची माहिती चीनला दिल्याचे म्हटले होते.
भारताला अधिक महत्त्व
पूर्व लडाखमधील तणाव गेल्या चार महिन्यांपासून कायम असताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतीच रशियाला भेट दिली. विशेष म्हणजे यावेळी चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंगहीदेखील रशिया दौ-यावर होते. मात्र, फेंगही यांच्या तुलनेत सिंह यांना व्यासपीठावर अधिक प्राधान्य मिळाले. सिंह यांचे रशियात झालेले स्वागत पाहता यजमान देशाने चीनच्या तुलनेत भारतासोबतच्या मैत्रीला अधिक महत्त्व दिल्याची चर्चा होती.