दैनिक स्थैर्य । दि.०६ मार्च २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात माजी लष्करी अधिकाऱ्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातारा तालुक्यातील मिल्ट्री अपशिंगे या गावामध्ये रशियन बनावटीचा रणगाडा दाखल झाला आहे. युद्धातील स्मृती जपण्या करता या रणगाड्यांला गावात ठेवणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले यामुळे मिलिटरी अपशिंगे गावाच्या शिरपेच यामध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे
राज्यांमध्ये भाजपची सत्ता असताना माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी आदर्श ग्राम योजनेअंतर्गत मिलिटरी अपशिंगे हे गाव दत्तक घेतले होते . त्यावेळी पुणे येथील दक्षिण मुख्यालयाच्या लष्करी केंद्राशी संपर्क साधून या गावांमध्ये रणगाडा देण्यात यावा अशी मागणी त्यांनी कागदोपत्री केली होती दरम्यानच्या काळामध्ये राज्यामध्ये झालेला सत्ताबदल आणि या कामाचा पाठपुरावा करताना आलेल्या अडचणी यामुळे हे काम बराच काळ रखडले होते मात्र विद्यमान पालकमंत्री व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा सैनिक कल्याण केंद्राच्या माध्यमातून या मागणीचा पुन्हा एकदा पाठपुरावा करून रणगाडा दाखल होईल याची व्यवस्था केली
रशियन बनावटीचा t55 हा रणगाडा एका विशेष लष्करी वाहनाने दिनांक दोन मार्च रोजी सकाळी मिलिटरी अपशिंगे गावात आणण्यात आला यावेळी गावकऱ्यांनी या रणगाड्याचा चे विशेष स्वागत केले. रणगाडा ठेवण्याकरता गावाच्या मध्यवर्ती विशेष स्थळाची निर्मिती करण्यात आली होती गावातून रणगाड्याची मिरवणूक सुद्धा वाजत गाजत काढण्यात आली अशा पद्धतीने रणगाडा भेट मिळालेले मिलिटरी अपशिंगे हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव गाव असल्याचा विश्वास गावकर यांनी व्यक्त केला. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व पालकमंत्री बाळासाहेब पाटील व माजी आमदार सदाभाऊ खोत यांना ग्रामस्थांनी विशेषत्वाने धन्यवाद दिले आहेत.