दैनिक स्थैर्य । दि. ०१ मार्च २०२२ । मुंबई । युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियावर जगातील अनेक देश निर्बंध लागत आहेत. जगातील अनेक देश रशियावर कारवाई करत असताना आता त्यांच्यावर एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. क्रीडा विश्वाने याआधी राष्ट्रपती पुतीन यांच्यावर कारवाई केल्यानंतर आता रशियाला आणखी एक मोठा धक्का बसलाय. फुटबॉलमधील सर्वात शिखर संस्था फिफाने रशियाला वर्ल्डकप २०२२ मधून बाहेर केले आहे. फिफा पाठोपाठ युरोपियन फुटबॉल संघाने देखील रशियावर बंदी घातली आहे.
वर्ल्डकपमधून बाहेर
या वर्षी कतारमध्ये फुटबॉल वर्ल्डकप होणार आहे. या स्पर्धेतून रशियाला फिफाने बाहेर केले आहे. इतक नाही तर रशियामधील फुटबॉल क्लबना जगातील सर्व स्पर्धांतून आणि चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळण्यापासून रोखण्यात आले आहे. युएफाने दिलेल्या माहितीनुसार रशियामधील फुटबॉल क्लब स्पोर्ट्स मॉस्कोला युरोपियन लीगमधून बाहेर केले आहे. याचा अर्थ आता आरबी लीपजिंगचा संघ थेट क्वार्टर फायनलमध्ये पोहोचेल.
डबल दणका
फिफाने फक्त रशियाच्या फुटबॉल संघावर बंदी घातील नाही तर राष्ट्रपती पुतीन यांना देखील दणका दिलाय. फिफाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही पूर्णपणे युक्रेन आणि तेथील लोकांसोबत उभे आहोत. फिफाने अशा व्यक्त केली आहे की, युक्रेनमध्ये लवकरच परिस्थिती सुधारेल. फुटबॉल पुन्हा एकदा लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि शांतता निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडले. आंतरारष्ट्रीय ऑलिंपिक समितीने पुतीन यांना दणका दिलाय. पुतिन यांना २०२१ मध्ये देण्यात आलेले ऑलिम्पिक ऑर्डर देखील परत घेम्यात आले आहे. त्याच बरोबर रशियाच्या अन्य अधिकाऱ्यांना देण्यात आलेला सन्मान देखील परत घेतला आहे.
येत्या २४ मार्चपासून रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये वर्ल्डकप पात्रताफेरीचे सामने होणार होते. युकेनवर हल्ला केल्यानंतर पोलंडने मॅच खेळण्यास नकार दिला. त्यापाठोपाठ स्वीडन आणि चेक प्रजासत्ताकने देखील रशियाविरुद्ध खेळणार नाही अशी भूमिका घेतली आहे. जुलै महिन्यात महिला संघाची मॅच होणार होती. ही लढत इंग्लंडमध्ये या वर्षी होणाऱ्या युरोपियन चॅम्पियनशिप पात्रता फेरीसाठी होती.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने याआधीच रशियावर बंदी घालण्याची शिफारस केली होती. गेल्या वर्षी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत रशियाच्या खेळाडूंना राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत वापरता आले नव्हते. त्याऐवजी ते रशियाच्या ऑलिम्पिक समितीचा ध्वज वापर होते. IOAने म्हटले आहे की, जागतिक खेळाचे संरक्षण करण्यासाठी या कारवाईची गरज आहे. समितीने घातलेली बंदी फक्त रशियावर नाही तर बेलारूसचे खेळाडू आणि अधिकाऱ्यांवर देखील आहे. कारण त्यांनी रशियाच्या हल्ल्याचे समर्थन केले आहे.