स्थैर्य , दि .२६: काही दिवसांपूर्वी परत एकदा डीमॉनेटायजेशन होणार असल्याची अफवा पसरली होती, परंतु हे खोटं असल्याचे स्पष्ट झालं आहे. सरकार 100, 50 आणि 10 रुपयांच्या जुन्हा नोटा बंद करणार नसल्याचं RBI ने स्पष्ट केलं आहे.
रिजर्व बँकेने दिले स्पष्टीकरण
रिजर्व बँकेने लहान करंसी बंद होणार नसल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. त्यांनी सांगितले की, ‘काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये अशा बातम्या प्रसारित झाल्या होत्या की, 100, 50 आणि 10 रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार आहे. पण, असा कोणताही प्रकार होणार नाही’, असे आरबीआयने स्पष्ट केले.
नोटाबंदीनंतर नवीन नोटा आल्या
नोटाबंदीनंतर RBI ने आतापर्यंत वेगवेगळी व्हॅल्यू असलेल्या 7 करंसी नोटा जारी केल्या आहेत. यात 2000, 500, 200, 100, 50, 20 आणि 10 रुपयांचा समावेश आहे. या सर्व महात्मा गांधी सीरीजच्या नोटा आहेत आणि या सर्वांवर एतिहासिक ठिकाणांचे फोटो छापले गेले आहेत.