
स्थैर्य, कोळकी, दि. ६ ऑक्टोबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कोळकी विभागाच्या वतीने विजयादशमी उत्सवानिमित्त रविवारी, दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या पथसंचलनामध्ये गणवेशधारी स्वयंसेवक, बाल स्वयंसेवक आणि मातृशक्ती मिळून एकूण ६९ जण सहभागी झाले होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संजय जामदार उपस्थित होते, तर संघाचे जिल्हा बौद्धिक प्रमुख मंदार बडवे यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले.