दुध दरवाढीसाठी रासपचे म्हसवडमध्ये आंदोलन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now



स्थैर्य, म्हसवड, दि २ : महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर 10 रुपये अनुदान व दुधाला 30 रुपये भाव व दूध पावडरला प्रति किलोस 50 रुपयाचे अनुदान मिळावे या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दूध बंद आंदोलन करीत  गोरगरिबांना मोफत दूधाचे वाटप केले.

या आंदोलनाची सुरवात क्रातीसुर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन करण्यात आली. रा स प माण-खटाव विधानसभा अध्यक्ष मा प्रा सचिन होनमाने यांच्या हस्ते म.फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार  घालण्यात आला, यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी माजी मंत्री जानकर व महायुतीच्या नावाने जयघोष करीत जोवर सर्वसामान्य शेतकर्यांचे प्रश्न सुटणार नाहीत तोवर रासपा आंदोलन छेडतच राहिल असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी कायदे सल्लागार रा स प विलास चव्हाण,ओबासे सर, शरद दडस,  दाद माळवदे, दोरगे साहेब,अजित लाडे सर, आकाश विरकर, महानवर सर, भारत राखुडे, बंडुशेठ आटपाडकर, तुषार खाडे, संदीप होनमाने, आनंदा दोलताडे, राहुल सरतापे, सुनिल वाघमोडे , अमोल दडस, चंद्रकांत दडस, तानाजी कोकरे, दत्ता कोकरे, अभि सरतापे, दता खांडेकर, दादा विरकर व शेतकरी बांधव उपस्थित होते.

म्हसवड येथील म.फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालताना रासपचे पदाधिकारी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!