
दैनिक स्थैर्य । 8 मार्च 2025। फलटण। अनवा (ता. भोकधन, जि.जालना) येथील कैलास बोर्हाडे यांच्या अंगावर गरम सळईचे चटके देणार्या गुन्हेगारांवर मोका लावण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष सुनिल सोनवलकर यांनी निवेदनाद्वारे तहसिलदांकडे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, अनवा (ता. भोकधन, जि.जालना) येथील केलास बोर्हाडे यांच्या अंगावर स्थानिक गावगुंडांनी गरम सळईने चटके देऊन अमानवी कृत्य केले आहे.
तसेच बिडकीन (ता. पैठण, जि. संभाजीनगर) येथे मुढाळे (ता. बारामती) येथील टेंगळे मेंढपाळ कुटुंबियांवर फुकट बकरे देत नाही या कारणावरून स्थानिक गावगुंडांनी दादागिरी करत प्राणघातक हल्ला केला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्लेखोरांना अटक करून मोका अंतर्गत कारवाई करावी असे म्हटले आहे.