दैनिक स्थैर्य । दि. ०५ एप्रिल २०२३ । सातारा । गतवर्षी सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्यात अतिवृष्टिमुळे शेतपीकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. जिल्हयातील 21 हजार 487 शेतकऱ्यांना 14 कोटी 4 लाख 18 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निर्णयामुळे भरपाईच्या प्रतिक्षेत असलेल्या बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गतवर्षी सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्यात जिल्हयात अतिवृष्टी झाली होती. पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले होते. प्रशासनानेही युद्धपातळीवर पंचनामे करुन नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर केला होता.
त्यानुसार फलटण तालुक्यातील 2 हजार 658 शेतकऱ्यांच्या 873.20 हेक्टरसाठी 2 कोटी 28 लाख 44 हजार रुपये, कोरेगाव तालुक्यातील 684 शेतकऱ्यांच्या 207.73 हेक्टरसाठी 35 लाख 88 हजार, कराड तालुक्यातील 168 शेतकऱ्यांच्या 33.14 हेक्टरसाठी 6 लाख 7 हजार, महाबळेश्वर तालुक्यातील 544 शेतकऱ्यांच्या 175.87 हेक्टरसाठी 47 लाख 56 हजार, पाटण तालुक्यातील 372 शेतकऱ्यांच्या 40.61 हेक्टरसाठी 3 लाख 93 हजार, खंडाळा तालुक्यातील 7 हजार 780 शेतऱ्यांच्या 1855.37 हेक्टरसाठी 4 कोटी 33 लाख 25 हजार, खटाव तालुक्यातील 4 हजार 433 शेतकऱ्यांच्या 1547.52 हेक्टरसाठी 3 कोटी 64 लाख 39 हजार, माण तालुक्यातील 3 हजार 221 शेतकऱ्यांच्या 1050.37 हेक्टरसाठी 2 कोटी 58 लाख 46 हजार, सातारा तालुक्यातील 32 शेतकऱ्यांच्या 7.76 हेक्टरसाठी 1 लाख 11 हजार, जावली तालुक्यातील 73 शेतकऱ्यांच्या 3.18 हेक्टरसाठी 77 हजार व वाई तालुक्यातील 1 हजार 522 शेतकऱ्यांच्या 178.43 हेक्टरसाठी 24 लाख 32 हजार असे एकूण 21 हजार 487 शेतकऱ्यांच्या 5973.18 हेक्टरसाठी 14 कोटी 4 लाख 18 हजार रुपये नुकसानभरपाई शासनाकडून मंजुर करण्यात आली आहे.