
स्थैर्य, दि.२८: आयपीएलच्या 13 व्या सीजनचा 9वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेवन पंजाबदरम्यान शारजाहमध्ये होत आहे. राजस्थानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने राजस्थानला या सीजनमधील सर्वाधिक 223 धावांचे टार्गेट दिले होते. हे टार्गेट राजस्थानने तीन चेंडून राखत पूर्ण केले. राजस्थानने आयपीएलचे सर्वात मोठे टार्गेट चेज केले. संजू सॅमसन आणि राहुल तेवतिया ठरले विजयाचे हिरो.
या मैदानात राजस्थान आणि चेन्नईमध्ये झालेल्या मागील सामन्यात 33 षटकार मारण्यात आले होते. त्यामुळे आज आजदेखील हाय स्कोरिंग पाहायला मिळू शकतो. राजस्थानमध्ये जोश बटलरला संधी देण्यात आली आहे. पण, आजच्या सामन्यातही पंजाबने क्रिस गेलला बाहेर ठेवले आहे.
मागील 5 सामन्यात पंजाबने 4 वेळा राजस्थानला पराभूत केले आहे. तर, 2014 मध्ये शारजाहमध्येच दोन्ही संघ समोरासमोर आले होते, ज्यात पंजाबने राजस्थानला 7 विकेट्स ने पराभूत केले होते. लीगमध्ये हा पंजबाचा तिसरा आणि राजस्थाचा दुसरा सामना आहे. पंजाबने 1 मॅच जिंकला आणि 1 हरला आहे. तर, राजस्थानने आपल्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केले.
दोन्ही संघ
राजस्थान: जोस बटलर, स्टीव स्मिथ (कर्णधार), संजू सैमसन (विकेटकीपर), रॉबिन उथप्पा, राहुल तेवतिया, रियान पराग, टॉम करन, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, जयदेव उनादकट आणि अंकित राजपूत.
पंजाब: मयंक अग्रवाल, लोकेश राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, करुन नायर, सरफराज खान, जिमी नीशम, मुरुगन अश्विन, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी आणि शेल्डन कॉटरेल.
लीगमध्ये सर्वाधिक स्कोर बनवणारा राहुल
बंगळुरूविरुद्ध मागच्या मॅचमध्ये राहुलने 132 धावा केल्या होत्या. हा लीगमध्ये भारतीय खेळाडूकडून झालेला आतापर्यंतचा सर्वाधिक स्रोअर आहे. यापूर्वी ऋषभ पंतने 128 धावा केल्या आहेत. परंतू, 175 धावांसह क्रिस गेल टॉपवर आहे.
दोन्ही संघातील महाग खेळाडू
राजस्थानमध्ये कर्णधार स्मिथ 12.50 कोटी आणि संजू सॅमसन 8 कोटींसह सर्वात महाग खेळाडू आहेत. तर, पंजाबमध्ये कर्णधार लोकेश राहुल 11 कोटी आणि ग्लेन मॅक्सवेल 10.75 कोटींसह टॉपवर आहेत.