
दैनिक स्थैर्य | दि. २७ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
सरडे बंगला, फलटण येथे आरपीआय आठवले गट महिला आघाडी बोर्डाचे उद्घाटन आरपीआयचे जिल्हा सचिव श्री. विजय येवले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आरपीआयचे श्री. राजू मारुडा, जिल्हा उपाध्यक्ष, संजय निकाळजे जिल्हा कार्यकारणी सदस्य, सतीश अहिवळे अध्यक्ष फलटण तालुका, महिला आघाडीच्या विमलताई काकडे अध्यक्ष फलटण तालुका, मीनाताई काकडे उपाध्यक्ष फलटण तालुका, आशाताई काकडे उपाध्यक्ष फलटण शहर, संजय वाघमारे अध्यक्ष बारामती तालुका, मयूर मोरे युथ अध्यक्ष बारामती तालुका, सरडे बंगला शाखाप्रमुख श्रीमती सुमन शिंदे, शीतल शिंदे उपाध्यक्ष, संगीता शिंदे खजिनदार, प्रियंका शिंदे सचिव, प्रिया शिंदे कार्याध्यक्ष, हसीना शेख सरचिटणीस, श्री. दयानंद बनसोडे, भीमा बनसोडे, अंकुश मोरे, विजय मोरे या सर्वांनी सरडे बंगला शाखाप्रमुख, महिला आघाडी पदाधिकारी यांचे अभिनंदन करून पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.