
दैनिक स्थैर्य | दि. १३ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
साखरवाडी ते फलटण अशा निघालेल्या पायी लाँग मार्चमध्ये साखरवाडी येथे असलेली बौध्द विहाराची जागा मिळावी यासाठी गेली अनेक वर्षांची मागणी असूनही साखरवाडीचे प्रशासन, लोकप्रतिनिधी, सरपंच या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष किंवा टाळाटाळ करीत आहेत. ही बौध्द विहाराची शासकीय जागा असूनही प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही होत नाही. पायी लाँग मार्चला ही बौध्द विहाराची जागा मिळावी, या मागणीला फलटण तालुका व शहर रिपब्लिकन पार्टीतर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
फलटण आरपीआय आठवले गटाने बौेध्द विहाराची जागा मिळण्यासाठी जाहीर पत्रकाद्वारे हा पाठिंबा दिला आहे. या पत्रकावर सातारा जिल्हा सचिव विजय येवले, पश्चिम महाराष्ट्र संघटक मधुकर काकडे, सातारा सरचिटणीस मुन्ना शेख, जिल्हा उपाधक्ष राजू मारुडा, आरपीआय फलटण तालुका अध्यक्ष सतीश अहिवळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संजय निकाळजे, फलटण शहराध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, तालुकाध्यक्ष विमलताई काकडे, शहराध्यक्ष सारिका अहिवळे, जिल्हा उपाध्यक्ष राखी कांबळे, मीनाताई काकडे, संतोष काकडे, संजय अहिवळे आदींच्या सह्या आहेत.