
स्थैर्य, सातारा, दि. 12 नोव्हेंबर : सातारकरांचे जीवन अधिक आनंदी, सुसह्य होण्यासाठी रोटरी क्लब ऑफ सातारा व रोटरी क्लब ऑफ सातारा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नैवेद्यम हा प्रकल्प गेले बारा वर्षे निरंतर राबविला जात आहे. आर्यांग्ल वैद्यकीय इस्पितळात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना व गरजू नातेवाईकांना रोकरीच्या माध्यमातून रोज सकाळ संध्याकाळ विनामूल्य भोजन दिले जाते. 28 फेब्रुवारी 2013 पासून सुरू झालेल्या या प्रकल्पामधून पंचाहत्तर हजारांपेक्षा जास्त रुग्ण व नातेवाईकांना भोजन दिलेले आहे. त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ सातारा हा 24/07/1944 रोजी स्थापन झालेल्या या क्लबच्या माध्यमातून सातारा शहरात गेली ब्याऐंशी वर्षे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. नुकत्याच रोटरी तर्फे बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट ला रोटरी प्रांत 3132 च्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व निधीतून शीत शवपेटीचे लोकार्पण करण्यात आले होते.
या सर्व प्रकल्पाची पोहोच म्हणून रोटरी क्लब ऑफ सातारा चे 1988 पासून कार्यरत असलेले सदस्य प्रा डॉ. धनंजय देवी यांचा प्रातिनिधिक सत्कार सातारा कोविड डिफेंडर ग्रुपतर्फे करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ सातारा व रोटरी क्लब ऑफ सातारा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून प्रा देवी व त्यांचे सहकारी करीत असलेले योगदान अमूल्य आहे. या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ सातारा चे 2015-26 अध्यक्ष किशोर डांगे व सचिव अभिजित लोणकर, तसेच रोटरी क्लब ऑफ सातारा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रो अॅड. सुनिल सांगळे, नियोजित अध्यक्ष रो. मनोज गायकवाड व सहसचिव रो. जयवंत जगताप हे सत्काराप्रसंगी उपस्थित होते. सातारा कोविड डिफेंडर ग्रुपचे सर्व सदस्यांनी हॉटेल सुर्वेज या ठिकाणी या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सातारा कोविड डिफेंडर ग्रुप च्या या अभिनव उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले

