
दैनिक स्थैर्य । दि. १९ फेब्रुवारी २०२३ । बारामती । सर्वसामान्य जनतेशी नाळ असलेला रोटरी क्लब नेहमी सामाजिक हित डोळ्यासमोर ठेवून विविध सामाजिक उपक्रम राबवित असतो हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन बारामती हाय टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ बारामती,रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टऐंड आणि सिल्करुट यांच्या संयुक्त विद्यामानाने हस्तकला प्रदर्शन चे आयोजन करण्यात आले होते याच्या उदघाटन प्रसंगी सुनेत्रा पवार बोलत होत्या यावेळी अध्यक्ष रो. प्रा.डॉ अजय दरेकर,पुणे वेस्टन्ड चे अध्यक्ष रो. नितीन वाशिकर,सचिव रो. अरविंद गरगटे, रो. रविकिरण खारतोडे, रो. दर्शना गुजर, रो. किशोर मेहता रो. दत्ता बोराडे व जयश्री पाटील,अंजली गांधी, संदीप गुजर, स्मिता बोराडे, सचिन चौरे, मेहता, चौरे व इतर मान्यवर उपस्तीत होते.
सामाजिक बांधीलकी जोपासत रोटरी ने उत्तम कार्य करून माणुसकी साठी आदर्श घालून दिला असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
हस्तकला प्रदर्शन मुळे अनेक महिलांना रोजगार प्राप्ती झाली असून रोटरी बालकां पासून ज्येष्ठा पर्यंत सामाजिक बांधीलकी साठी कटिबद्ध असल्याचे प्रास्ताविक मध्ये अध्यक्ष रो. डॉ अजय दरेकर यांनी सांगितले. सूत्रसंचालन श्री सावळेपाटील व आभार सुवर्णा देवधर यांनी मानले .