
दैनिक स्थैर्य । 25 मे 2025। आसू। येथील रूजल सागर फाळके हिने ऑल इंडिया सैनिक स्कूलच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता सहावी प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. तिची अंबिकापूर (छत्तीसगड) येथील सैनिक स्कूलसाठी निवड झाली आहे.
रूजलचे वडील सागर दिगंबर फाळके हे पंजाब येथे, तर चुलते आकाश दिगंबर फाळके बेंगलोर येथे भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत.
या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. हे यश तिचे दिवंगत आजोबा कै. दिगंबर गजानन फाळके यांना समर्पित केल्याची भावना रुजल हिने व्यक्त केली.