रोहित शर्मा यांच्या हस्ते ‘इन्फिनिटी लर्न’ ऍप लाँच

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २२ एप्रिल २०२२ । मुंबई ।  इन्फिनिटी लर्न बाय श्री चैतन्यने त्यांचे प्रमुख ऍप ‘इन्फिनिटी लर्न’च्या लाँचची घोषणा केली. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या हस्ते इन्स्टा लाइव्हवर हे ऍप लाँच करण्यात आले. या ऍपमध्ये द्विमार्गी इंटरऍपक्टिव्ह व्हिडिओ क्लासेस, २४X७ त्वरित शंकेचे निरसन, स्वयं-अध्ययन, मूल्यांकन, प्रगतीबाबत सविस्तर अहवाल आणि इतर अनेक विद्यार्थी-केंद्रित वैशिष्‍ट्ये आहेत. इन्फिनिटी लर्नने विद्यार्थ्यांच्या प्रवासामध्ये यशाची भर करण्यास मदत करण्यासाठी अद्वितीय ‘४ए लर्निंग मॉड्यूल’ देखील सादर केले आहे.

हे ऍप विद्यार्थ्यांना सर्वांगीण अध्ययन अनुभव देते. या ऍपचा विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षकांच्या वैयक्तिकृत व परस्परसंवादी अध्यापनासह मदत करण्याचा आणि इयत्ता ६वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रबळ कन्टेन्ट देण्याचा मनसुबा आहे. ते आता आयआयटी, नीट व सीबीएसई बोर्ड परीक्षा अशा स्पर्धात्मक परीक्षांसाठी उत्तमरित्या तयारी करू शकतात.

जाहिरातीची थीम ‘जीत पक्की’ आहे, जेथे रोहित शर्माला दररोज व प्रत्येकवेळी कसे खेळावे, कसे जिंकावे इत्यादींबाबत सल्ला व सूचना दिल्या जातात. रोहित प्रत्युत्तर देतो की तो त्याच्या प्रशिक्षकाचे ऐकत या यशाच्या पायरीपर्यंत पोहोचला आहे, ज्‍यांनी त्याला योग्य सल्ला दिला. इन्फिनिटी लर्न या जाहिरातीच्या माध्यमातून संदेश देते की “फक्त तज्ञ विद्यार्थ्यांना यशस्‍वी बनण्यामध्ये मार्गदर्शन करू शकतो आणि विद्यार्थ्यांच्या ‘जीत पक्की’च्या दिशेने प्रवासामध्ये सहयोगी बनू शकतो”.

इन्फिनिटी लर्न बाय श्री चैतन्यच्या संस्थापकीय संचालक सुषमा बोप्पाना म्हणाल्या, “इन्फिनिटी लर्नचा विद्यार्थ्यांच्या डिजिटल अध्ययन अनुभवामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा मनसुबा आहे. आम्ही आमच्या ३६ वर्षांहून अधिक काळाच्या क्लासरूम अध्यापन अनुभवाचा वापर करत सर्वांगीण अध्ययन अनुभव निर्माण केला आहे, जो सर्वसमावेशक, प्रभावी व मापनीय आहे. व्यावहारिक अध्यापन व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या संयोजनासह आमची डिजिटल अध्ययन वातावरणांमध्ये प्रत्यक्ष क्लासरूममधील सहभाग संपादित करण्याची इच्छा आहे. आमचा विश्वास आहे की, इन्फिनिटी लर्न विद्यार्थ्यांना यशस्वी बनण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेमध्ये मदत करेल.”


Back to top button
Don`t copy text!