
स्थैर्य, फलटण, दि. 28 नोव्हेंबर : प्रभाग क्रमांक ५ चे भाजप उमेदवार रोहित नागटिळे यांनी प्रभागात प्रचाराचा चांगलाच जोर धरला आहे. प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून, त्यांनी केलेला घरोघरी प्रचार अत्यंत प्रभावी ठरत असल्याचे चित्र आहे.
प्रभागातील नागरिक रोहित नागटिळे यांच्याकडे युवा आणि उमदे नेतृत्त्व म्हणून आशेने पाहत आहेत. त्यांच्याकडे नवीन दृष्टिकोन आणि काम करण्याची ऊर्जा आहे, असा विश्वास लोकांना वाटत आहे.
रोहित नागटिळे यांची थेट माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी असलेली जवळीकता हा त्यांचा मोठा प्लस पॉईंट मानला जात आहे. यामुळे प्रभागात मोठ्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा लोकांना आहे.
एकंदरीत, युवा नेतृत्त्व, थेट संपर्क आणि रणजितदादांचे पाठबळ या त्रिसूत्रीमुळे रोहित नागटिळे यांचा प्रचार प्रभावी ठरत आहे. प्रभागाच्या विकासासाठी त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

