श्रीमंत सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी रोहित कर्वे


दैनिक स्थैर्य | दि. ३ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटणमधील बुधवार पेठेतील प्रसिद्ध श्रीमंत सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचा यावर्षीचा अध्यक्षपदाचा मान रोहित अनिल कर्वे यांना मिळाला आहे.

मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गणेश बाळकृष्ण कापसे व किरण काशिनाथ दळवे हे असून मंडळामध्ये दरवर्षी अनेक उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये स्वच्छता मोहीम, मच्छरांसाठी औषध फवारणी मोहीम, कोरोनामध्ये अन्नदान, लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध स्पर्धा आणि विविध बक्षिसे, गरीब-गरजूंना वेगवेगळ्या प्रकारची मदत, रक्तदान शिबिर आणि नऊ दिवस फराळ वाटप असे उपक्रम राबविले जातात.

मंडळाचे सर्व सभासद, उपाध्यक्ष, खजिनदार, सेक्रेटरी, कार्याध्यक्ष हे नेहमी मंडळामध्ये सक्रिय असतात, अशी माहिती मंडळाचे उपाध्यक्ष शेखर कर्वे यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!