स्थैर्य, कराड, दि. २८ : कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांना करोनाची बाधा झाल्याने त्यांच्यावर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र शहरात करोना बाधितांची संख्या वाढत असल्याने त्यांनी जिल्हाअधिकारी व प्रांतअधिकारी यांच्याशी फोनवरून याबाबत चर्चा केली. तसेच मुख्याधिकारी रमाकांत डाके व प्रशासकीय अधिकाऱयांशी फोनवर संपर्क साधुन आढावा घेतला. दरम्यान शहरात करोना बाधितांची संख्या वाढत असल्याने नागरीकांनी काळजी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी केली केले आहे.
करोनाचे संकट सुरू झाल्यापासुन नगराध्यक्षा रोहिणी शिंदे शहराच्या सुरक्षिततेसाठी ऑनफिल्ड आहेत. मात्र त्यांनाच करोना ची बाधा झाल्याने त्यांना उपचारासाठी कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्यांचे पती उमेश शिंदे यांनी सांगीतले आहे. दरम्यान कराड शहरात करोना बाधितांची संगया वाढत असताना रोहिणी शिंदे यांनी जिल्हाअधिकारी व प्रांतअधिकारी यांसोबत फोन वरून सविस्तर चर्चा केली.तसेच मुख्याधिकारी व पालिकेतील अधिकऱयांशी फोन वरून संपर्क साधुन सातत शहराच्या परीस्थीतीतीचा आढावा घेत आहेत. लवकरच करोना मुक्त होवुन पुन्हा शहरवासीयांच्या सेवेत हजर रहाण्याचा विश्वास रोहिणी शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शहरात रूग्णांची संख्या वाढत असल्याने नागरीकांनी स्वताची व कुटुंबाची काळजी घ्यावी व प्रशासनांच्या सुचनांचे पालन करून प्रशासनास मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचा करोना चा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे समजताच कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी धिर देत संपुर्ण कृष्णा परिवार आपल्या सोबत आहे. तसेच कराडकर जनतेच्या शुभेच्छा आपल्या सोबत असल्याचे सांगीतले तसेच त्यांच्यावर करण्यात येत असलेल्या उपचाराबाबत स्वता डॉ.सुरेश भोसले माहिती घेत असल्याचे सांगण्यात आले.