दैनिक स्थैर्य | दि. 13 जानेवारी 2025 | फलटण | लोणंद येथे एक अनोळखी महिलेने एका घरात घुसून अपंग महिलेचे गळ्यातील मंगळसूत्र जबरीने हिसकावल्याची धक्कादायक घटना घडली.
लोणंद पोलीस ठाणे अंतर्गत येणार्या एका निवासस्थानात, अनोळखी महिलेने घरात घुसून प्रेमा घुले यांचे गळ्यातील 50,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरीने हिसकावले. या घटनेनंतर फिर्यादी मनोज घुले यांनी लोणंद पोलीस ठाणेत गुन्हा दाखल केला, ज्यामध्ये रॉबरीचा गुन्हा रजि. क्र. 15/2025 बी. एन. एस. कलम 309 (4) प्रमाणे नोंदवण्यात आला.
पोलिसांच्या विशेष पथकाने महिला पोलीसांमार्फत कसून चौकशी केली. या चौकशीतून आरोपी महिलेला निष्पन्न करण्यात आले व चोरी केलेले मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले.