स्थैर्य, सातारा, दि.१६: साताऱ्यात पुणे-मुंबई हायवेवरील एका पेट्रोलपंपावर रात्री उशीरा दरोडा पडला. सहा दरोडेखोर पेट्रोलपंपावर पोहोचले आणि त्यांनी एक कर्मचारी आणि मॅरेजरला वाईट पद्धतीने मारहाण केली. दरोडेखोर येथून 27 हजार रोख आणि 12 हजारांचे दोन मोबाइल घेऊन पसार झाले.
एसपी तेजस्वी सातपुते यांनी सांगितले की, शिवडे तालुक्यातील कराड येथे सोमवारी रात्री एक ते अडीच दरम्यान घडलेल्या या घटनेदरम्यान सर्व आरोपींच्या तोंडावर मास्क आणि कपडा बांधलेला होता. मात्र, त्यांचे हे कृत्य कॅमेरात कैद झाले आहे. व्हिडिओ फुटेजमध्ये एक दोन चेहरे दिसत आहेत. आरोपी दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने येथे आला आणि कार्ड स्वॅपिंगच्या बहाण्याने मॅनेजरच्या केबिनमध्ये घुसला, असेही तपासात उघड झाले आहे. आरोपींनी त्यांच्या दोन्ही बाइकची टँक फूल केली होती.
एका कर्मचाऱ्याच्या डोक्याला लागला मार एका कर्मचाऱ्याला काही कळण्याच्या आत त्यांनी स्वॅपिंग मशिननेच त्याला मारण्यास सुरुवात केली. मशीनमुळे सचिन पवार या कर्मचाऱ्याच्या डोक्याला मार बसला आहे. मॅनेजरच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. दोघांनी सांगितले तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी दरोडा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करुन तपासास सुरुवात केली आहे. सध्या सर्वच आरोपी फरार आहेत.