
दैनिक स्थैर्य । दि. 26 मे 2025 । फलटण । फलटण शहरासह शहराची उपनगरे अर्थात कोळकी, जाधववाडी व फरांदवाडी या ठिकाणी असणार्या रस्त्यांना संततधार व मुसळधार पावसामुळे नद्यांचे स्वरुप आलेले नागरिकांना बघायला मिळाले.
फलटण शहरात व उपनगरातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांच्यामुळे अनेक छोटे, मोठे अपघात सुध्दा गेल्या दोन दिवसात बघायला मिळाले आहेत. यामुळे रस्त्यांच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आता पुढील काळात होणार्या रस्त्यांचे दर्जेदार कामकाज व्हावे; अशी मागणी सुध्दा पुन्हा नव्याने जोर धरु लागली आहे.