
दैनिक स्थैर्य | दि. 08 एप्रिल 2025 | फलटण | फलटण शहरात सर्वच महापुरुषांच्या जयंती उत्सव हे मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. त्यानिमित्त सर्वच महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण फलटण शहरात विविध रॅलीचे आयोजन करण्यात येते. हे आयोजन मोठ्या उत्साहाने आणि समारंभपूर्वक साजरे केले जाते. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर स्तंभ आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक यांच्या जयंती सुद्धा आहेत. व चौक परिसरातच खड्ड्यांचे साम्राज्य बनले होते. दैनिक स्थैर्यच्या माध्यमातून आवाज उठवल्यानंतर फलटण नगरपरिषदेने तातडीने सदरील कामकाज केले आहे.
परंतु फलटण शहराच्या प्रमुख ठिकाणांच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य झाले होते. महापुरुषांच्या जयंती निमित्ताने त्यावेळी, असा अनुभव येऊ नये म्हणून फलटण नगरपरिषदेच्या माध्यमातून या रस्त्यांवर पॅचवर्क करण्याचे काम सुरु केले आहे. महात्मा फुले चौक, महावीर स्तंभ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ही ठिकाणे प्रमुख आहेत जिथे खड्डे बुजवण्याचे काम वेगाने सुरु आहे.
भारतीय जनता पार्टीचे फलटण शहराध्यक्ष अनुप शहा आणि भगवान महावीर जयंती उत्सव समितीच्या वतीने फलटण नगरपरिषदेकडे खड्डे बुजवण्याची मागणी केली होती.
या मागणीनंतर प्रशासनाने गती दाखवली आहे आणि आता पॅचवर्क काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.