सातारा जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे मजबुत करणार : बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे; पुणे – सातारा रस्त्याच्या सहापदरीकरणासाठी प्राधान्य

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 23 डिसेंबर 2024 | सातारा | सार्वजनिक बांधकाम विभागाचा कॅबिनेट मंत्री या नात्याने मंत्रीपद सांभाळताना सातारा जिल्ह्यातील दळणवळण प्रक्रिया सुलभ करणे आणि त्यासाठी जिल्हा अंतर्गत रस्त्यांचे जाळे मजबूत करणे ही प्राथमिकता असणार आहे. पुणे ते सातारा रस्त्याचे सहापदरीकरण या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करण्यात आली असून या रस्त्याच्या ठेकेदार कंपनीकडून हे काम काढून घेतले जाणार आहे. रिलायन्स इन्फ्रा या ठेकेदार कंपनीच्या तक्रारी वाढल्या आहेत; त्यामुळे लवकरच या रस्त्यासाठी फेरनिविदा काढली जाणार असून महामार्गाच्या सहापदरीकरणाची कामे चांगल्या पद्धतीने करण्यात येणार आहेत; असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.

मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यभार जाहीर झाल्यानंतर मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर शिरवळ येथे मोठ्या जल्लोषात कार्यकर्त्यांनी स्वागत केले. बाळासाहेब खंदारे मित्र समूहाच्या वतीने व भाजप कार्यकारिणीचे वरिष्ठ पदाधिकारी अनुप सूर्यवंशी मित्र समूहाच्या वतीने 21 फुटी हार क्रेनच्या माध्यमातून मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना घालण्यात आला तिथून ते थेट साताऱ्यापर्यंत ठीक ठिकाणी मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे स्वागत सत्र नंतर सुरूच राहिले होते. शिरवळ येथे स्वागताच्या समारंभात मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले कि; सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद हे अत्यंत महत्त्वाचे असून सातारा जिल्ह्यातील चारही मंत्र्यांची जबाबदारी वाढलेली आहे. सातारा जिल्ह्याने महायुतीला भरभरून साथ दिली आहे. त्यादृष्टीने भारतीय जनता पार्टीने त्यातून उतराई होणे तसेच पक्षाची मजबूत वाटचाल ठेवणे याकरिता जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री पदे दिली आहेत. ना. शंभूराज देसाई यांना पर्यटन, ना. जयकुमार गोरे यांना ग्रामविकास तर ना. मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन ही खाती दिली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील प्रश्न सुटायला आता काहीच हरकत नाही. पाटणमध्ये अतिवृष्टी तर माण तालुक्यांमध्ये दुष्काळ खंडाळा तालुक्यामध्ये पाणीटंचाई साताऱ्यामध्ये सेवा अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था या सर्व प्रश्नांना आम्ही कॅबिनेट मंत्री म्हणून निश्चितच न्याय देणार आहोत.

पालकमंत्री पदाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील

पालकमंत्री म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. या संदर्भात बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले कि; सध्या सार्वजनिक बांधकाम मंत्री पदाच्या संदर्भात मी माहिती घेत असून ही माझी पहिलीच टर्म आहे सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या नावाची चर्चा या संदर्भात मला काही माहीत नाही. मात्र या प्रश्नावर महायुतीचे तिन्ही वरिष्ठ नेते या संदर्भात निर्णय घेतील; पक्षाच्या माध्यमातून मला जो आदेश दिला जाईल; त्या पद्धतीने माझी कामाची अंमलबजावणी असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.


Back to top button
Don`t copy text!