स्थैर्य, सातारा, दि. 18 : सातारा येथील पोवई नाका परिसरात ग्रेड सेपरेटरचे काम सुरु आहे. हे काम अंतिम टप्यात आले असतानाच गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास रस्ता खचण्याचा प्रकार घडला. ही बाब जेव्हा वाहतूक शाखेचे जवानाने निदर्शनास आणून दिली तेव्हा मात्र बांधकाम विभागातील तेथील टी एण्ड टी कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह ताराबंळ उडाली. परंतु त्वरित तात्पुरती मलम पट्टीचे काम हाती घेण्यात आले आहे.
पोवई नाक्यावर महत्वकांक्षी ग्रेड सेपरेटरचे काम सुरु आहे. हे काही टक्केच उरले आहे. काही दिवसामध्ये काही पूर्ण होण्याची शक्यता आहे. असे असताना गुरुवारी सकाळी राजपथकडून येणाऱ्या रस्ता हा अर्धा फुट भाग खचल्याची बाब वाहतूक शाखेचे जवान यांच्या निदर्शनास आली. त्यांनी धोकादायक वाहतूक होवू नये म्हणून बॅरिकेट लावले. त्यावरुन टी ऍण्ट टी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची आणि त्यांची थोडीशी वादावादीही झाली. बांधकाम विभागास त्यांनी माहिती दिली. लगेच बांधकाम विभागाचे अधिकारी तेथे आले अन् त्यांनी पाहणी करत लगेच जेसीबीच्या सहाय्याने तेवढा डांबरीकरणाचा भाग उकरुन काढत पुन्हा नव्याने पॅचिंग करण्याचे काम हाती घेतले. त्याबाबत बांधकाम विभागाचे अभियंता रविंद्र आंबेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, रस्ता खचलेला नाही. खडी जरा सरकली होती. ते काम करुन घेण्यात येत आहे.